कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रवाशांची पोलिसांकडून लुटमार

कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रवाशांची लुटमार काही पोलिसांकडून करण्यात येत होती. या प्रकरणी जीआरपीच्या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

Updated: Apr 26, 2016, 01:54 PM IST
कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रवाशांची पोलिसांकडून लुटमार  title=

मुंबई : कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रवाशांची लुटमार काही पोलिसांकडून करण्यात येत होती. या प्रकरणी जीआरपीच्या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनल्सवर प्रवाशांना लुटून मारहाण करणाऱ्या लोहमार्ग पोलिसांचा सीसीटीव्ही व्हिडिओ झी मीडियाने दाखवला होता. या प्रकरणात आता दोन पोलिसांचं निलंबन करण्यात आलंय. 

त्याचप्रमाणे यात आणखी काही पोलीस कर्मचारी असल्यानं पुढील तपास सुरु आहे. हे सीसीटीव्ही फुटेज कधीचं आहे? याचा पोलीस तपास करतायत. याबाबत आधी लोहमार्ग पोलीस अधिकारी बोलण्यास तयारच नव्हते. अखेर यावर अवघ्या दोन ओळीत पोलीस उपायुक्त लोहमार्ग पोलीस यांनी प्रतिक्रिया दिली.