पोलिसांच्या पत्नींनी उद्धव ठाकरेंकडे मांडली कैफियत

पोलिसांवर वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस कुटुंबीयांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली.

Updated: Sep 4, 2016, 10:54 PM IST
पोलिसांच्या पत्नींनी उद्धव ठाकरेंकडे मांडली  कैफियत title=

मुंबई : पोलिसांवर वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस कुटुंबीयांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली.

यावेळी पोलिसांच्या पत्नींनी उद्धव ठाकरे यांच्यापुढे आपली कैफियत मांडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बैठक घेणार असल्याची ग्वाही उद्धव ठाकरे यांनी पोलिसांच्या पत्नींना दिली.

येत्या ७ सप्टेंबरला वर्षा या बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि पोलिसांच्या पत्नींची बैठक होणार असून विविध मागण्यांवर चर्चा होणार आहे..