राहुल गांधींचा प्रमोशनवर ५०० कोटी खर्च

लोकसभा निववडणुकीला सामोरे जाताना राहुल गांधींचा ब्रँड आणखी सशक्त व्हावा यासाठी 500 कोटी खर्च करण्याची योजना काँग्रेस पक्षानं आखलीय. तर भाजपनंही नरेंद्र मोदींचा ब्रँड मजबूत करण्यासाठी काम सुरु केलंय.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 10, 2014, 11:42 AM IST

www.24taas.com, उत्कर्ष चतुर्वेदी झी मीडिया, मुंबई
लोकसभा निववडणुकीला सामोरे जाताना राहुल गांधींचा ब्रँड आणखी सशक्त व्हावा यासाठी 500 कोटी खर्च करण्याची योजना काँग्रेस पक्षानं आखलीय. तर भाजपनंही नरेंद्र मोदींचा ब्रँड मजबूत करण्यासाठी काम सुरु केलंय. राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी या दोन ब्रँडवर जाहीरात विश्वात कसं काम सुरु आहे, याचा पाहूया विशेष रिपोर्ट
लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्राचे पडघम आता वाजू लागलेत. या निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात मुख्य लढत होतीय. ( मोदी आणि राहुल यांचा एंबियंस ) या दोन नेत्यांमधला सामना आजवर केवळ भाषणांमधून होत होता.आता या लढाईत जाहिरात आणि पीआर एजन्सींनीही उडी घेतलीय. काँग्रेसनं राहुल गांधींना पक्षाचा सर्वात मोठा ब्रँड एंबेसेडर बनवल्याची तयारी केलीय.
युवकांची नस ओळखणारा, अधुनिक आणि आक्रमक नेता अशी राहुलची प्रतिमा करण्याची कॉँग्रेसची योजना आहे. राहुल यांची ही प्रतिमा तयार व्हावी यासाठी 500 कोटी खर्च करण्याची पक्षाची तयारी आहे. जपानी जाहिरात कंपनी डेन्टसला राहुलचे प्रोफाईल नव्याने तयार करण्याची जबाबदारी देण्यात आलीय.
भाजपनं नरेंद्र मोदींना यापुर्वीच पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषीत केलाय. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला याचा फायदाही झालाय. मोदींचा ब्रँड आणखी मजबूत व्हावा यासाठी भाजपानं 300 कोटीचं अंदाजपत्रक बनवलंय. देशाचं भवितव्य घडवणारा नायक अशी मोदींची प्रतिमा तयार करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.
भाजप आणि काँग्रेसमध्ये ही लढाई सुरु असतानाच यात आता अरविंद केजरीवाल यांचा उदय झालाय. दिल्ली काबीज केल्यानंतर केजरीवाल यांच्याकडे युवा वर्गाचा ओढा वाढतोय. तर भाजप आणि काँग्रेसमध्ये आपल्या नेत्यांना युवकांचा मसिहा भासवण्याचा खटाटोप सुरु आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.