मुंबई : भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्या सैनिकांबाबत वादग्रस्त विधानावर विधान परिषदेत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. परिचारक यांना कायमचं निलंबित करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली.
मुख्यमंत्री जोपर्यंत परिचारकांचं कायमचं निलंबन करत नाहीत आणि तसा प्रस्ताव सभागृहात आणत नाहीत तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू देणार नसल्याचा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी यांनी दिलाय, त्यामुळे आता हा वाद आणखीनच पेटण्याची चिन्ह दिसत आहेत.
दरम्यान प्रशांत परिचारक यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा शिवसेनेनंही समाचार घेतला आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी परिचारक यांना फासावर लटकवण्याची मागणी केली असती, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार नीलम गोऱ्हेंनी दिली आहे.