पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांच्या रडारावर

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा सुरू झाल्यानंतर आता उर्वरित चारही पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधानांना आपल्या रडारवर आणलंय. मनसेचे राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींबाबत प्रश्न उपस्थित केलेत.  मोदी देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे असा सवाल राज यांनी केलाय.

Updated: Oct 6, 2014, 12:42 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांच्या रडारावर title=

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा सुरू झाल्यानंतर आता उर्वरित चारही पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधानांना आपल्या रडारवर आणलंय. मनसेचे राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींबाबत प्रश्न उपस्थित केलेत.  मोदी देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे असा सवाल राज यांनी केलाय.

मोदी केवळ एका पक्षाचे पंतप्रधान आहेत का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, नारायण राणे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याही टार्गेटवर सध्या पंतप्रधानच आहेत.

देशाचे पंतप्रधान विधानसभेच्या निवडणुकीत देशाचा कारभार सोडून राज्यात २२ सभा घेतायत आणि यामुळे पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेला त्यांनी तडा दिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी केलाय, ते सोलापुरात प्रचार सभेत बोलत होते, यावेळी त्यांनी मोदी आणि भाजपच्या नीती वर सडकून टीका केली, राष्ट्रवादी राहून भ्रष्टाचार करणा-यांना पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला तर ते आज भाजप चे उमेदवार झालेत, ही भाजप ची नीती म्हणत त्यांच्यावर टीकेची झोड उठवत भाजपच्या पोस्टर बाजी, जाहिरातींवर कोपरखळ्या मारल्या.

राष्ट्रवादीचे नेते आर आर पाटलांच्या बालेकिल्लात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केलाय. पवारांनी केवळ शिवरायांच्या नावाने राजकारण केल्याचा आरोप मोदींनी केलाय. शिवरायांना सुरतेचे लुटेरे म्हणणारे त्यांच्याच नावाने मतं मागत असल्याची टीका पवारांनी भाजपवर केली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.