माजी गृहमंत्री आर. आर. पाटलांचा अल्प परिचय

रावसाहेब रामराव पाटील यांचा जन्म १६ ऑगस्ट, १९५७ ला सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात असलेल्या अंजनी गावात झाला. आर. आर. पाटील यांना सर्व लोक आबा म्हणून ओळखतात.

Updated: Feb 16, 2015, 04:54 PM IST
माजी गृहमंत्री आर. आर. पाटलांचा अल्प परिचय title=

मुंबई : रावसाहेब रामराव पाटील यांचा जन्म १६ ऑगस्ट, १९५७ ला सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात असलेल्या अंजनी गावात झाला. आर. आर. पाटील यांना सर्व लोक आबा म्हणून ओळखतात.

आर. आर. पाटील हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध राजकारणी होते. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य असून सांगलीचे आमदार आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री होते. ते लोकांमध्ये स्वच्छ चारित्र्याचे आणि प्रामाणिक नेते म्हणून प्रसिद्ध होते.

ते इ.स. १९९० पासून सांगली जिल्ह्यातील तासगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. २६ नोव्हेंबर, इ.स. २००८ रोजी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्यानंतर पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यांनंतर बेजबाबदार वक्तव्यांसाठी आर. आर. पाटील हे टीकेचं लक्ष्य बनले होते. यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.