वादळ कसं निर्माण करायचं मला माहित आहे - राज ठाकरे

वादळ कसं निर्माण करायचे ते मला समजते आणि ते मी निर्माण करेन असे सांगून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी फुंकण्याचा प्रयत्न केला. 

Updated: Jan 30, 2015, 09:23 PM IST
वादळ कसं निर्माण करायचं मला माहित आहे - राज ठाकरे  title=

मुंबई : वादळ कसं निर्माण करायचे ते मला समजते आणि ते मी निर्माण करेन असे सांगून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी फुंकण्याचा प्रयत्न केला. 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या पक्षाच्या पराभवानंतर आज मुंबईत मनसेचं चिंतन शिबीर आयोजित केले. त्यावेळी ते बोलत होते.  मनसे अध्यक्ष राज ठाकरे तब्बल तीन महिन्यांनी मौन सोडले.

यावेळी त्यांनी ठाकरे शैलीत फटकेबाजी केली. मुंगी माणसाच्या ढुंगाणाला चावू शकते पण माणूस मुंगीच्या ढुंगाणाला चावु शकत नाही. माझे आधी ही म्हणणे होते आणि आजही आहे की नरेंद्र मोदी भारतचे पंतप्रधान व्हावेत गुजरातचे नाही, असे म्हणून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली. 

यावेळी  शिबिरच्या व्यासपीठावर फ़क्त राज ठाकरे उपस्थित होते. नेते मात्र सभागृहात पहिल्या रांगेत बसले होते. यावेळी राज ठाकरे यांनी नव्या युवा शिलेदारांचे केले कौतुक केले. 

राज ठाकरे आता कार्यकर्त्यांना 'स्काइप'वर भेटून संवाद साधणार आहेत. तसेच मनसेच्या प्रत्येक शाखेचे अणि विभागाचे बँक खाते उघडले जाणार आहे. 

यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे म्हणाले, की बाळासाहेबांच्या शिवसैनिकांसारखी अंगात रग असू द्या. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.