मुंबई दंगल : आबा राजीनामा द्या- राज ठाकरे

मुंबईतील हिंसाचार रोखण्यासाठी राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील आणि पोलीस यंत्रणा पूर्णत: अपयशी ठरली आहे. आर आरना गृहखातं समजलेलच नाही. त्यामुळे पोलीस आयुक्त आणि आर आर यांच्या राजीनाम्यासाठी २१ रोजी मोर्चा काढणार आहोत, अशी माहिती आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 17, 2012, 07:23 PM IST

www.24taas.com,मुंबई
मुंबईतील हिंसाचार रोखण्यासाठी राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील आणि पोलीस यंत्रणा पूर्णत: अपयशी ठरली आहे. आर आरना गृहखातं समजलेलच नाही. त्यामुळे पोलीस आयुक्त आणि आर आर यांच्या राजीनाम्यासाठी २१ रोजी मोर्चा काढणार आहोत, अशी माहिती आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबईतील दंगलीनंतर पोलिसांचे खच्चीकरण केलं जात आहे. माझ्या कार्यकर्त्यांवर दरोड्यांचे गुन्हे दाखल मात्र, इथे त्यांना सोडले जाते, असे का? गृहखातं टग्या समजणारे अजित पवार यांनी हातात घ्यावं, असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
मुंबईतील दंगलीसाठी आधीपासून तयारी सुरू होती. काही ठिकाणी पत्रके वाटली गेलीत. हे मुंबई पोलीस आणि गृहमंत्र्यांचं अपयश आहे. दंगेखोरांना रस्त्यावरून आणून चांगले झोडपून काढले पाहिजे.
मुंबईतील हॉटेल ताजवरील हल्ल्यानंतर आर आर पाटील यांच्याकडून गृहखात काढून घेतलं होतं, मग निवडणुकीनंतर त्यांनाच गृहखातं कसं दिलं गेले. टोल नाक्यावरील आंदोलनात हजारो पोलीस ताकद दाखवतात. त्यावेळी पोलिसांचं शेपूट उठते, मात्र आझाद मैदानावरील आंदोलनावेळी त्यांची शेपूट आत जाते, असं का असे यावेळी राज ठाकरे म्हणाले. यावेळी राज्य शासनावर सडकून टीका केली.