मुंबई : मुंबईच्या गोरेगावमध्ये आज राज ठाकरेंची जाहीर सभा होतेय. विधानसभेच्या पराभवानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच जनतेला सामोरे गेलेले दिसत आहेत.
पाहुयात काय म्हणतायत ते या सभेत...
पराभवानंतर खचलेली माणसं मला आवडत नाहीत - राज
भरतीनंतर ओहोटी हा तर निसर्ग नियम
'केजरीवाल यांना मीडियानं पुन्हा डोक्यावर घेतलंय'
राजकारणात चढ-उतार येतच असतात
जय-पराजय लहानपणापासून पाहत आलोय
लतादीदी सोडल्या तर सर्वांत बॅडपॅच येऊन गेलाय
बाळासाहेबांकडून बाळकडू घेतलंय...
बाळकडू घेतलंय... मिळालेलं नाही... पाहून पाहून शिकलोय
मी ते स्वत: अनुभवलंय - राज ठाकरे
मनसेचा जन्म निवडणुकांसाठी झालेला नाही तर महाराष्ट्रासाठी झालाय
नरेंद्र मोदी आज उत्तम पंतप्रधान आहे
पण, ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या मी बोलणारच
नरेंद्र मोदींच्या महागड्या सुटावर राज ठाकरे गरजले
'मोदींच्या महागड्या कोटानं गंगा स्वच्छ होणार का?'
नरेंद्र दामोदर मोदी लिहिलेल्या कोटावर टीका झाली म्हणून केला लिलाव... टीका झाली नसती तर...
पंतप्रधानांच्या कोटाचा लिलाव महाराष्ट्रात का नाही, कर्नाटकात नाही... इतर कोणत्याही राज्यांत का नाही... केवळ गुजरातमध्येच का?
पंतप्रधान हा देशाचा असतो, तो एखाद्या राज्याचा नसतो
जुन्या शिवसैनिकांसारखं काम करा, राज ठाकरेंचं मनसे कार्यकर्त्यांना आवाहन
'निवडणुकीआधी टोलमुक्त महाराष्ट्र करण्याची घोषणा करणारे आज गप्प आहेत... त्यांना नाही आज कुणी प्रश्न विचारत'
'जे गप्प बसले त्यांना नाही प्रश्न विचारले... मांडवली झाली का म्हणून?'
'माझ्यावर आजही अनेक केस आहेत... कोणत्याही सरकारकडे गेला नाही राज ठाकरे'
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.