राज ठाकरेंनी केली 'आरे'कॉलनीची पाहणी

मेट्रो ३ प्रकल्पाचे काम सुरु होण्यापूर्वीच तो वादात सापडलाय. हा प्रकल्प मराठी माणसाच्या मूळावर उठणारा असल्याचा आरोप करत तो उखडून टाकू अशी भूमिका शिवसेना आणि मनसे या राजकीय पक्षांनी घेतालीये.  या पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आरे वसाहतीमधील मेट्रोच्या वादग्रस्त कारशेडच्या जागेची पाहणी केली. 

Updated: Mar 16, 2015, 12:01 PM IST
राज ठाकरेंनी केली 'आरे'कॉलनीची पाहणी title=

मुंबई: मेट्रो ३ प्रकल्पाचे काम सुरु होण्यापूर्वीच तो वादात सापडलाय. हा प्रकल्प मराठी माणसाच्या मूळावर उठणारा असल्याचा आरोप करत तो उखडून टाकू अशी भूमिका शिवसेना आणि मनसे या राजकीय पक्षांनी घेतालीये.  या पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आरे वसाहतीमधील मेट्रोच्या वादग्रस्त कारशेडच्या जागेची पाहणी केली. 

या कारशेडसाठी मोठ्याप्रमाणात वृक्षतोड केली जाणार असल्यानं मनसेनं त्याला तीव्र विरोध केलाय. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मीला आणि चिरंजीव अमित यांनी या वादग्रस्त कारशेडच्या जगेची यापूर्वीच पहाणी केली होती. हे कारशेड दुसऱ्या ठिकाणी हलवा अशी मागणी करत मनसेनं आंदोलन हाती घेतलंय.

या प्रकल्पामुळे गिरगाव मधील मराठी भाषिकांच्या चाळीवर संकट येण्याची भीतीही व्यक्त होतेय. आज प्रकल्पाचे अधिकारी, गिरगाव वसीय आणि शिवसेना नेते यांच्यातही बैठक होतेय. या प्रकल्पविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रकल्प अधिकाऱ्यांच्या प्रयत्न आहे.

दरम्यान राज ठाकरे दुपारी पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील भूमिका स्पष्ट करणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.