शर्मिला ठाकरेंना 'बॉन्ड'नं घेतला चेहऱ्यावर चावा; डॉक्टरांनी घातले ६५ टाके

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना त्यांच्याच पाळीव कुत्र्यानं चावा घेतलाय. 

Updated: Aug 19, 2015, 06:44 PM IST
शर्मिला ठाकरेंना 'बॉन्ड'नं घेतला चेहऱ्यावर चावा; डॉक्टरांनी घातले ६५ टाके  title=

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना त्यांच्याच पाळीव कुत्र्यानं चावा घेतलाय. 

मंगळवारी दुपारी 2 वाजल्या दरम्यान कुत्र्याला खाऊ घालायला गेलेल्या शर्मिला यांच्या अंगावर कुत्रा धावून आला आणि त्यानं शर्मिला यांच्या चेहऱ्यावर चावा घेतला. कुत्र्यानं घेतलेला हा चावा इतका गंभीर आहे की त्यामुळे शर्मिला यांच्या चेहरा रक्तबंबाळ तर झालाय शिवाय त्यांच्या गालाच्या हाडालाही दुखापत झालीय. 


फाईल फोटो

मिळालेल्या माहितीनुसार, शर्मिला यांच्या चेहऱ्यावर ६५ टाके पडले आहेत. शर्मिला यांच्यावर माहिमच्या हिंदूजा हॉस्पीटलमध्ये प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन अनिल टिंबरवाला यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर सर्जरी करण्याची गरज असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार राज ठाकरे यांच्या प्रेस कॉन्फरन्सच्या अगोदर ही घटना घडल्याचं सांगण्यात येतंय. प्रेस कॉन्फरन्सनंतर राज ठाकरे तडक  पत्नीला पाहण्यासाठी हॉस्पीटलमध्ये दाखल झाले. 

राज ठाकरे यांच्या 'कृष्णकुंज' या घरी जेम्स आणि बॉन्ड असे दोन कुत्रे आहेत. ग्रेटडेन ब्रीडच्या या दोन्ही कुत्र्यांसाठी घरातच तळमजल्यावहर स्पेशल रुम्सही बनवण्यात आल्यात. 

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या दोन्ही कुत्र्यांसाठी स्पेशल ट्रेनिंगचीही व्यवस्था करण्यात आलीय. 

शर्मिला ठाकरे या प्रसिद्ध कलाकार, अभिनेते, प्रोड्युसर आणि दिग्दर्शक मोहन वाघ यांच्या कन्या आहेत.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.