राज ठाकरेंच्या हस्ते त्या टॅक्सी चालकाचा सत्कार

टॅक्सीमध्ये विसरलेली बॅग प्रवाशाला परत करणाऱ्या टॅक्सी चालकाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कृष्णकुंजवर बोलावून सत्कार केला आहे.

Updated: Oct 15, 2016, 05:56 PM IST
राज ठाकरेंच्या हस्ते त्या टॅक्सी चालकाचा सत्कार title=

मुंबई : टॅक्सीमध्ये विसरलेली बॅग प्रवाशाला परत करणाऱ्या टॅक्सी चालकाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कृष्णकुंजवर बोलावून सत्कार केला आहे.

70 हजार रुपयांची रोकड आणि बॅगमध्ये असलेला मोबाईल, आधार कार्ड आणि इतर कागदपत्र टॅक्सीचालक नितीन गार्डी यांनी प्रवाशाला परत दिली आहेत.

टाटा हॉस्पिटलला जात असताना भामाबाई यादव त्यांची बॅग नितीन यांच्या टॅक्सीमध्ये विसरल्या. थोड्यावेळानं या महिलेचा फोन आल्यानंतर नितीन गार्डी यांनी बॅग आपल्याकडे असल्याचं सांगितलं आणि या सगळ्या गोष्टी प्रवासी महिलेला परत दिल्या.