राम पंडागळे शिवसेनेत, राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राम पंडागळे यांनी बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेश करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले.

Updated: Aug 14, 2014, 08:07 AM IST
राम पंडागळे शिवसेनेत, राष्ट्रवादीवर गंभीर आरोप  title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राम पंडागळे यांनी बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेश करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले.

दलित अत्याचारांमागे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा आरोप त्यांनी केलाय. खैरलांजी प्रकरणी आपला आवाज दाबण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय. 

तसंच राष्ट्रवादी काँग्रेसनं हजारो कोटींच्या भूखंडांचाही भ्रष्टाचार केल्याचा दावा त्यांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रसने आपल्याला मालाड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. पण आपण ती त्यांना साभार परत कऱणार आहोत असं त्यांनी जाहीर केलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.