...तर, राज यांना मुंबईतून हाकलवू- रामदास आठवले

राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे बिहारमधील मराठी माणसाला कोणी हात लावला तर राज ठाकरेंनाच मुंबईतून हाकलून देण्याची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा आरपीआय अध्यक्ष रामदास आठवलेंनी दिलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 2, 2012, 04:32 PM IST

www.24taas.com, मुंबई
राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे बिहारमधील मराठी माणसाला कोणी हात लावला तर राज ठाकरेंनाच मुंबईतून हाकलून देण्याची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा आरपीआय अध्यक्ष रामदास आठवलेंनी दिलाय.
बिहारमध्ये मराठी माणसांना त्रास झाला तर त्यांच्या संरक्षणासाठी तिथं जाऊ. तसंच महाराष्ट्रतही बिहारींना त्रास झाला तर त्यांच्यासाठीही रस्त्यावर उतरू, असंही रामदास आठवलेंनी स्पष्ट केलं.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजही मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात परप्रांतियांवर शरसंधान केलं मुंबईतले आरोपी युपी आणि बिहारमध्येच का जातात असा सवाल राज ठाकरेंनी केला. बिहारमध्ये महाराष्ट्रातील गुन्हेगारांना आश्रय मिळतो, असा आरोपही राज ठाकरेंनी केला. यावर वेगवेगळे नेते आता प्रत्युत्तरं देण्यास सुरूवात करत आहेत. रिपाइं अध्यक्ष रामदासस आठवलेही यात पुढे आहेत.