www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आजकाल विनयभंगाचे आणि बलात्काराची प्रकरणं दिवसेंदिवस वाढतच चालली आहेत. मुंबईची दिल्ली होतेय की काय? असंच काहीसं वाटू लागलं आहे. मुंबईत बलात्कार आणि विनयभंग सारख्या गुन्ह्यांत ५७ टक्क्यांनी वाढ झाली, हि धक्कादायक माहिती ‘प्रजा फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेनं केलेल्या पाहणीतून समोर आलीय.
उत्तर-मध्य मुंबई या गुन्ह्यांमध्ये आघाडीवर आहे. २०११-१२ तसंच २०१२-१३ या वर्षांमध्ये बलात्कार आणि विनयभंग सारख्या गुन्ह्यांत ५७ टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त नीताई मेहता यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि उपनिरिक्षकांची ५० टक्के कमतरता आहे. त्यामुळं अशा गंभीर गुन्ह्याच्या ४७ हजारांहून अधिक केस प्रलंबित आहे, असं मेहता यांनी सांगितलं.
आजकाल अनेक महिला कामानिमित्त बाहेर पडतात. घरात अथवा घराबाहेर, रेल्वेतील प्रवासापासून ते कार्यालयातील कामापर्यंत, कुठंच महिला सुरक्षित नाही. महिलांचा सुरक्षेचा प्रश्न सुटणार तरी कधी हाच मुद्दा सगळीकडे विचारला जातोय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.