मुंबई: मुंबईच्या चेंबुर परिसरात दोघांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडलीय. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पोलीस अधिक तपास करत आहे.
वाशीनाका परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला सलमान मोहम्मद फहीम खान या तरुणानं गोड बोलून गाडीवरून फिरवून आणायला नेलं. मात्र वाशीनाका इथल्या आपला मित्र इरफान कादर याच्या घरी नेवून दोघांनीही तिच्यावर बलात्कार केला. ही घटना मार्च महिन्यातील आहे.
आणखी वाचा - क्रूर बापानं आईसमोरचं चिमुरडीला जमिनीवर आपटून ठार केलं!
दोघांनी तिला धमकी दिल्यानं मुलगी काही बोलली नाही. पण दोन्ही आरोपींनी आपला दुसरा मित्र शाहबाद याला आपण केलेलं कृत्य सांगितलं. मग शाहबाद यानंही मुलीला त्रास द्यायला सुरूवात केली. शेवटी सहन न झाल्यानं मुलीनं आपल्या आईला सर्व घटना सांगितली. मुलीच्या आईनं नातेवाईकांसह आरसीएफ पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार केली. पोलिसांनी लगेच आरोपींना अटक केलीय.
तर तिसरा आरोपी शाहबाद हा फरार आहे. त्याचा शोध घेणं सुरू आहे. तिन्ही आरोपी २०-२५ वयोगटातील आहे.
आणखी वाचा - 'बलात्काराला ग्लॅमर देतंय मीडिया' - पंकजा मुंडे
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.