मुंबई : राज्यातले सर्व रेशन दुकानदार १ जुलैपासून दुकानात धान्य आणि केरोसीन विक्रीला ठेवणार नाहीत. तसंच त्याची विक्री करणार नसल्याची घोषणा, ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकिपर्स फेडरेशननं केली आहे.
रेशन दुकानदारांना सरकारकडून जो पर्यंत अधिक कमिशन दिलं जात नाही, तो पर्यंत दुकानदार उचल आणि वितरण करणार नसल्याची घोषणा करण्यात आली आहे.
रेशन दुकानदार सरकारचाच एक घटक आहे. मात्र त्यांच्यावर मोका लावून सरकारनं सरकारवरच गुन्हे दाखल करण्याचा घाट घातलाय, असा आरोप, ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकिपर्स फेडरेशननं केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.