मुंबई : आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांना आलेला धमकीचा ई-मेल हा प्रॉक्झी आहे, हा नायझेरीन टोळीचा खोडसाळपणा असल्याचे स्पष्टीकरण मुंबई पोलीसांनी दिलंय.
पण, जो पर्यंत आरोपी पकडला जात नाही तोपर्यंत आम्ही सर्व बाजूंनी या गुन्ह्याचा तपास करणार आहोत, असं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.
आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांना ईसीसी या संघटनेने मेलकरून धमकी दिली असल्याचं सुरूवातीला सांगण्यात येत होतं.
मात्र आता हा ई-मेल प्रॉक्झी असल्याचं तपासात समोर आलं आहे, तरीही हे प्रकरण पोलिसांनी गंभीरतेने घेतलं असून मुंबई पोलिस आरोपीपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.