सलमान खान नेमका काय बोलला कोर्टात...

हिट अँड रन खटल्यात जबानी देण्यासाठी सलमान खान सकाळी कोर्टात आला, त्यावेळी त्यानं फुल पांढरा शर्ट आणि डार्क ब्ल्यू कलरची पँट घातली होती. सुनावणीच्या वेळी तो थोडा टेन्स दिसत होता. त्याला साक्षीदारांच्या पिंज-यात उभं केल्यानंतर त्यानं न्यायाधीशांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर त्याची जबानी कशी झाली, ते पाहूयात...

Updated: Mar 27, 2015, 07:26 PM IST
सलमान खान नेमका काय बोलला कोर्टात... title=

मुंबई : हिट अँड रन खटल्यात जबानी देण्यासाठी सलमान खान सकाळी कोर्टात आला, त्यावेळी त्यानं फुल पांढरा शर्ट आणि डार्क ब्ल्यू कलरची पँट घातली होती. सुनावणीच्या वेळी तो थोडा टेन्स दिसत होता. त्याला साक्षीदारांच्या पिंज-यात उभं केल्यानंतर त्यानं न्यायाधीशांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर त्याची जबानी कशी झाली, ते पाहूयात...

न्यायालय - नाव

सलमान खान - सलमान सलीम खान

न्यायालय - आज तूझा जबाब नोंदवला जाणार आहे. कलम ३१३ नुसार तुझा हा जबाब नोंदवला जाईल. २७ नोव्हेंबर च्या रात्री २ वाजून १५ मिनिटांनी जेव्हा तू जे डब्लू मॅरीयेटमधून निघाला तेव्हा गाडी तू चालवत होतास ?

सलमान - चूक, ड्रायव्हर अशोक सिंह गाडी चालवत होता.

न्यायालय - पुढे अमेरिकन लाँड्री येथे गेल्यावर तूझ्या गाडीचा अपघात झाला ?

सलमान - हो

न्यायालय - रवींद्र पाटीलने कंट्रोल रुमला फोन करुन अपघाताची माहिती दिली ?

सलमान खान - चूक, मी माझ्या ड्रायव्हरला पोलीसांना फोन करायला सांगितलं.

न्यायालय - पुढे काय झालं ?

सलमान - अचानक आवाज झाला. मी बघितलं लोक आरडाओरडा करत होते.

न्यायालय - गाडीत तू कुठे बसला होतास?

सलमान - मी ड्रायव्हच्या बाजूच्या सीट वर बसलो होतो. माझा बॉडीगार्ड रवींद्र पाटील गाडीखाली उतरला आणि जमावाला त्याने आले पोलीस असल्याचे कार्ड दाखवले. पण जमाव काही ऐकायला तयार नव्हता. १५ मिनिटांनी मी गाडी खाली उतरलो आणि लोकांना शांत करुन जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर मी घटनास्थळावरुन निघून गेलो. मी ड्रायव्हर अशोकला पोलीसांना फोन करायला सांगितले.

न्यायालय - रवींद्र पाटील याची जी साक्ष नोंदवलीय, त्यानुसार तुझ्या ड्रायव्हरने त्यादिवशी दिवसा गाडी चालवली आणि रात्री अपघाताच्या वेळी तू गाडी चालवत होतास?

सलमान - चूक

न्यायालय - काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या साक्षीनुसार त्यांनी तुला ड्रायव्हर सीटवरुन खाली उतरताना पाहिले होते ?

सलमान - हो हे बरोबर आहे. कारण अपघातानंतर माझ्या डाव्याबाजूचा दरवाजा जॅम झाला म्हणुन मी ड्रायव्हर सीट वरुन खाली उतरलो. पण मी गाडी चालवत नव्हतो.

न्यायालय - तू ड्रायव्हर सीटवरुन उतरलास का?

सलमान - हो, कारण मी गाडीच्या मागच्या सीटवर बसलो होतो. आणि अपघात झाल्यानंतर लोकं माझ्या दिशेने गर्दीकरुन उभे होते. त्यामुळे मला तिथून उतरता येत नव्हते. म्हणुन मी पुढे जाऊन ड्रायव्हर सीटवरुन उतरलो.

न्यायालय -  सेवन स्टार पबमध्ये तू कॉकटेल मद्यपान केलं होते?

सलमान - चूक

न्यायालय - तू वाईट बकार्डी रम आणि विस्की प्यायला होता अशी साक्ष पब मॅनेजरने दिलीये?

सलमान :- चूक

न्यायालय :- तू जे डब्लू मेरीयेटमध्ये पांढ-या ग्लास मधून मद्य प्यायला होतास ?

सलमान :- मी पाणी प्यायलो होतो

न्यायालय :- जे डब्लू मेरीयेटच्या पार्किंग असिस्टंटने दिलेल्या साक्षीनुसार जे डब्लू मेरीयेड हाॅटेल मधून गाडी ड्रायव्हर सीट वर बसून तू चालवत नेलीस ?

सलमान :- चूक

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.