www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
जगभरात नावाजलेली ‘सी ड्रीम’ या लॅवीश जहाजाचं मुंबईत आगमन झालं. नऊ मजल्याचं हे आलिशान जहाज पहिल्यांदाच भारतात आलंय. ११२ विदेशी पर्यटकांना घेऊन जहाज मुंबई, गोवा आणि कोचीन असा प्रवास करणार आहे.
समुद्रातलं स्वप्न पूर्ण करणारं `सी ड्रीम` जहाज पहिल्यांदाच भारतात दाखल झालं. मुंबई, गोवा आणि कोचीन याठिकाणी इथल्या परदेशी पर्यटकांचा प्रावस होणर आहे. तब्बल नऊ मजल्यांचं हे राजेशाही क्रूझ जहाज भारतात आलंय. निळ्याशार महासागरात फिरताना आपल्याला हवा तसा हॉलिडे साजरा करण्याचा आनंद या क्रूझमध्ये मिळेल. अनेक देशांतल्या पर्यटनस्थळांना भेट देण्याची पर्वणी पर्यटकांना देणारं हे ‘सी ड्रीम’ क्रूझ आता भारतीयांच्या भेटीला आलंय. एकावेळी ११२ पर्यटकांना सामावणारं, आणि प्रत्येक पर्यटकामागे एका क्रूझ मेंबरची सेवा देणारं गे लक्झरीयस जहाज.. या जहाजात लायब्ररीपासून ते कॅसिनोपर्यंतच्या सर्व सेवा आहेत. स्पा, योगा, गेमिंग, जीम, संगीत, लॅन्ड अॅडव्हेन्चर इतकंच नाही तर या जहाजात शॉपिंगही करता येतं, अशी माहिती जहाजाच्या मॅनेजर गीतांजली यांनी दिलीय.
मात्र, या लॅवीश अशा जहाजात सुट्ट्यांची मजा लुटायची असेल तर मोठी किंमत मोजावी लागेल. एका व्यक्तीसाठी तब्बल सात लाख रुपये खर्च करावा लागेल. मुंबईत या जहाजाचं स्वागत केलं पर्यटनमंत्री छगन भूजबळ यांनी... या जहाजामुळे परदेशी पर्यटक वाढणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला याचा फायदा होऊ शकेल, असं छगन भुजबळ यांना वाटतंय.
या आलिशान जहाजातून सर्वसामान्यांना फिरणं तसं कठिणच पण हे श्रीमंत जहाज आणि येणाऱ्या परदेशी पर्यटकांसाठी तरी आपली पर्यटन स्थळ सुधरवली गेली तरी धीम्या गतीने का होईना पण या पर्यटनामार्फत राज्याचा आर्थिक विकास होण्यास मदत होऊ शकेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.