www.24taas.com, मुंबई
महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी यंत्रणा अपुरी असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मान्य केलंय. महाराष्ट्रात या दिशेनं काम सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. दरम्यान, महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षितेसाठी राज्याच्या गृहमंत्र्यांनी कडक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतलाय.
गृहमंत्री आर. आर. पाटलांनी पोलिसांना सूचना दिल्यात. महिलांचा जबाब महिला पोलिसांनीच घ्यावेत असे निर्देश आर. आर. पाटल या नी दिलेत. महिलांच्या तक्रारीवर तातडीनं कारवाई करावी, महिलांची तातडीनं तक्रार दाखल करुन घ्यावी तसचं त्यावर तातडीनं कारवाई करण्य़ाचे निर्देशही गृहमंत्र्यांनी दिलेत.
कारवाई न करणा-या अधिका-यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय.