मुंबई : महापालिकेतील शिवसेनेच्या एका नगरसेविकेला १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ही कारवाई केली.
शिवसेनेची नगरसेविका आणि उत्तर दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष हेमांगी चेंबूर हिच्या सह तिच्या पीए राजाराम गोपाळ रेडकर याला अटक करण्यात आली आहे. हेमांगी चेंबूर मुंबई महापालिकेच्या वॉर्ड नंबर १९९ ची नगरसेविका असून याच भागातील १९१९ साली बनलेले एक हॉटेल मालकाकडून २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. हीच लाच घेण्यासाठी हेमांगी चेंबूर स्वत: हॉटेल मालकाला धमकावत असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
सुरुवातीला २५ हजार रुपये लाचेची रक्कम ठरली होती. पण हेमांगी चेंबूरच्या पीएने हॉटेल मालकाला हेमांगी चेंबूरच्या घरी घेऊन गेला आणि तिथे बोलणी झाल्यानंतर १५ हजार हेमांगी चेंबूर आणि १ हजार पीए राजाराम गोपाळ रेडकर याला अशी रक्कम देताना एसीबीच्या अधिका-यांनी दोघांना रंगेहाथ पकडले.
सध्या हे दोघे किडवाई नगर पोलीस स्टेशनमध्ये असून गुन्हा नोंदवण्याचे प्रक्रिया सुरु असल्याचे एसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले. उद्या या दोघांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.