सेना मेळावा : मोदींचं समर्थन; उपसलं `हिंदुत्वा`चं कार्ड!

शिवसेनेच्या ४८ वा दसरा मेळावा इतर अनेक कारणांमुळे गाजला असला तरी याप्रसंगी शिवसैनिकांशी संवाद साधताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोदींना पाठिंबा जाहीर करतानाच हिंदुत्वाचं कार्डही उपसून काढलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 13, 2013, 09:21 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनेच्या ४८ वा दसरा मेळावा इतर अनेक कारणांमुळे गाजला असला तरी याप्रसंगी शिवसैनिकांशी संवाद साधताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोदींना पाठिंबा जाहीर करतानाच हिंदुत्वाचं कार्डही उपसून काढलंय.
शिवसेना नरेंद्र मोदींच्या पाठिशी उभी आहे, असं सांगत उद्धव ठाकरेंनी मोदींना शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं पुन्हा एकदा जाहीर केलंय. यावेळी, ‘जेव्हा नरेंद्र मोदींना सर्वांनी विरोध केला तेव्हा एकाच व्यक्तीने त्यांना पाठिंबा दिला, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे’ अशी आठवणही त्यांनी यावेळी शिवसैनिकांना करून दिली. यावेळी त्यांनी काही काळ मागे टाकलेला हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा उपसून काढला.
‘बाळासाहेबांनंतर हिंदूंचा कुणीही वाली उरलेला नाही... हिंदूंच्या बाजूनं बोलणंच पाप झालंय... पण, जगायचं असेल तर एकच दिवस जगा, पण वाघासारखं’ या त्यांच्या वक्तव्याला शिवसैनिकांनी टाळ्यांनी प्रतिसादही दिला.

याच मुद्द्यावर बोलताना ‘तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, मुस्लिमांचे नाहीत… हिंदूंना एक आणि मुस्लिमांना दुसरा असा न्याय नको’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांवरही टीका केली. सोबतच आम्ही मुस्लिमविरोधी नाहीत, असंही त्यांनी म्हटलं. जोपर्यंत १०० कोटी हिंदू एकत्र येत नाही, तोपर्यंत ओवैसीसारख्याला फाशी होणार नाही, असंही यावेळी त्यांनी म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.