मुंबई : शेअर बाजाराची सकाळी सकारात्मक सुरूवात झाली. त्यानंतर मात्र बाजारात घसरण सुरू झाली आहे. सलग तीन सत्रांतील घसरणीनंतर शेअर बाजारात निराशावादी दृष्टिकोन कायम आहे. दुपारच्या सत्रात शेअर बाजारात जोरदार घसरण झाली आहे.
सध्या निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांक अनुक्रमे 1.81 आणि 1.97 टक्के कोसळले आहेत. आयटी कंपन्यांच्या आर्थिक निकालाने बाजारला निराश केले आहे. नुकतेच टीसीएस कंपनीने आर्थिक निकाल जाहीर केले होते.
शिवाय इन्फोसिसचे आर्थिक निकाल शुक्रवारी जाहीर होणार आहे. इन्फोसिसच्या नफ्यात घसरण बघायला मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दुपारच्या सत्रात शेअर बाजारात निराशा पसरली असून नफा वसुली सुरू झाली आहे.
सध्या निफ्टी 8 हजार 450 पातळीवर व्यवहार करत असून 155 अंशांनी कोसळला आहे. तर मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्सने 560 अंश गमावले असून 27 हजार 881 पातळीवर व्यवहार करत आहे. शेअर बाजारात आज घसरण होण्यास रिलायन्स इंडस्ट्रीज सर्वाधिक कारणीभूत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.