इंद्राणी आणि पीटरच्या घरातून पोलिसांनी जप्त केली सुटकेस

शीना बोरा हत्याप्रकरणात मुंबई पोलिसांनी आणखी एक सुटकेस जप्त केलीय. इंद्राणीनं दुसरी सुटकेस मिखाईलसाठी खरेदी केल्याचा बोललं जातंय. 

Updated: Aug 31, 2015, 10:02 AM IST
इंद्राणी आणि पीटरच्या घरातून पोलिसांनी जप्त केली सुटकेस title=

मुंबई: शीना बोरा हत्याप्रकरणात मुंबई पोलिसांनी आणखी एक सुटकेस जप्त केलीय. इंद्राणीनं दुसरी सुटकेस मिखाईलसाठी खरेदी केल्याचा बोललं जातंय. 

आणखी वाचा - इंद्राणीनं मिखाईलला मारण्यासाठी दिली होती सुपारी, कॉन्ट्रॅक्ट किलर अटकेत

इंद्राणीनं दादरमधून २ सूटकेस खरेदी केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पहिल्या सूटकेसमध्ये शीनाचा मृतदेह टाकून रायगडच्या जंगलात जाळण्यात आला. मिखाईलला मारण्यासाठी १० लाखांची इंद्राणीनं सुपारी दिल्याची माहिती ड्रायव्हर शाम रायनं दिलीय. 

आज संजीव खन्ना, इंद्राणी मुखर्जी आणि ड्रायव्हर श्याम रायची पोलीस कोठडी संपतेय. आज कोर्टात त्यांना हजर करण्यात येणार असून अधिक पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत. 

आणखी वाचा - संजीव खन्नानं दिली 'हत्ये'ची कबुली; शीनाच्या मृतदेहाचे अवशेष 'डीएनए' टेस्टसाठी!

 

इंद्राणी आणि संजीव खन्ना वारंवार एकमेकांवर आपल्याला फसवल्याचा आरोप लावलाय. तर खन्नानं आपण पैशासाठी इंद्राणीला मदत केल्याचं म्हटलंय. दरम्यान, इंद्राणीनं आपण शीनाचा राग करायचो हे कबुल केल्याचं कळतंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.