इंद्राणीनं मिखाईलला मारण्यासाठी दिली होती सुपारी, कॉन्ट्रॅक्ट किलर अटकेत

शीना बोरा हत्याप्रकरणात आणखी एक खुलासा झालाय. इंद्राणी मुखर्जीनं आपला मुलगा मिखाईल बोराला मारण्यासाठी मुंबईतील एका कॉन्ट्रॅक्ट किलरला सुपारी दिली होती.

Updated: Aug 31, 2015, 09:18 AM IST
इंद्राणीनं मिखाईलला मारण्यासाठी दिली होती सुपारी, कॉन्ट्रॅक्ट किलर अटकेत  title=

मुंबई: शीना बोरा हत्याप्रकरणात आणखी एक खुलासा झालाय. इंद्राणी मुखर्जीनं आपला मुलगा मिखाईल बोराला मारण्यासाठी मुंबईतील एका कॉन्ट्रॅक्ट किलरला सुपारी दिली होती.

आणखी वाचा - शीना हत्या प्रकरण: कार सापडली, तीनही आरोपींना घटनास्थळी नेणार पोलीस

इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियानुसार इंद्राणी मुखर्जीनं आपल्या मुलाला मारण्यासाठी सुपारी दिली. पण कॉन्ट्रॅक्ट किलरचे चार प्रयत्न अयशस्वी झाले. एवढंच नव्हे तर इंद्राणी आणि तिच्या सहकाऱ्यानं तब्बल अडीच लाख रुपये या हत्येसाठी दिले होते. 

आणखी वाचा - शीना बोराचा भाऊ मिखाईल स्वतःच अडचणीत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कॉन्ट्रॅक्ट किलर सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. शीना हत्याप्रकरणचा तपास करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. रविवारी तीनही आरोपींना रायगडला घटनास्थळी नेण्यात आलं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.