मुंबईत शिवसेना - भाजप उमेदवारांना समसमान मते, फेर मतमोजणी

मुंबई पालिका निवडणुकीत प्रभाग 220मध्ये 'टाय' झाली आहे. त्यामुळे या प्रभागाकडे लक्ष लागले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 23, 2017, 02:13 PM IST
मुंबईत शिवसेना - भाजप उमेदवारांना समसमान मते, फेर मतमोजणी title=

मुंबई : पालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रणसंग्राम पाहायला मिळाला. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्यात. मात्र, मुंबईत आपणच किंग असल्याचे पुन्हा एकदा शिवसेनेने दाखवून दिलेय. प्रभाग 220मध्ये 'टाय' झाली आहे. त्यामुळे या प्रभागाकडे लक्ष लागले आहे.

प्रभाग क्र 220मध्ये भाजपचे अतुल शहा आणि शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर यांना समसमान मते पडली आहेत. त्यामुळे येथे फेरमतमोजणी होणार आहे. यावेळी कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला असताना या ठिकाणी तणाव आहे.

दरम्यान, मुस्लिमबहुल बेहराम पाडा परिसरात शिवसेनेला प्रथमच यश मिळाले आहे. शिवसेनेचे हाजी अलीम विजयी झाले आहेत.