एमआयएमकडून विषाची पेरणी - शिवसेना, प्रणिती शिंदेंना पाठिंबा

ऑल इंडिया मजलिस-इ-इत्तेहादुल मुस्लीमीन (एमआयएम) या पक्षावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव नाराजी व्यक्त करत जोरदार टीका केली. अल्पसंख्यांक समुदायाच्या डोक्यात 'विष पेरण्याचे' काम करत आहे. महाराष्ट्र सरकारने त्वरीत करावाई करावी, अशी मागणी सेनेने केली आहे.

PTI | Updated: Nov 11, 2014, 06:11 PM IST
एमआयएमकडून विषाची पेरणी - शिवसेना, प्रणिती शिंदेंना पाठिंबा

मुंबई : ऑल इंडिया मजलिस-इ-इत्तेहादुल मुस्लीमीन (एमआयएम) या पक्षावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव नाराजी व्यक्त करत जोरदार टीका केली. अल्पसंख्यांक समुदायाच्या डोक्यात 'विष पेरण्याचे' काम करत आहे. महाराष्ट्र सरकारने त्वरीत करावाई करावी, अशी मागणी सेनेने केली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधूनही एमआयएमवर जोरदार टीका करण्यात आली. एमआयएमचे नेते असलेल्या ओवैसी बंधुंनी मुसलमानांच्या डोक्यामध्ये कायमच विष पेरण्याचे काम केल्याचा हल्लाबोल शिवसेनेने चढविला आहे. दरम्यान, एमआयएम देशद्रोही असल्याचे विधान काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना केला होता. प्रणिती शिंदे यांना सेनेने पाठिंबा दर्शविलाय. सामनामधून सेनेने यासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

प्रणिती शिंदे यांना एमआयएमने नोटीस बजावली असून माफी मागा नाहीतर खटल्यास तयार राहा असे नोटीसीत म्हटले आहे. दरम्यान, शिवसेनेच्या या भूमिकेनंतर हे प्रकरण अधिक पेटण्याची शक्‍यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.