मदर तेरेसा : मोहन भागवत यांच्या भूमिकेचं शिवसेनेकडून समर्थन

मदर तेरेसांबाबतच्या मोहन भागवत यांच्या भूमिकेचं शिवसेनेकडून समर्थन, भागवतांचं काय चुकलं, सामनाच्या अग्रेलखातून उघड पाठिंबा.शिवसेनेनं सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भूमिकेचं समर्थन केलंय. मदर तेरेसांबाबत मोहन भागवत यांनी केलेल्या विधानानंतर शिवसेनेनं सामनामधून त्यांना पाठिंबा दिलाय.

Updated: Feb 25, 2015, 03:41 PM IST
मदर तेरेसा : मोहन भागवत यांच्या भूमिकेचं शिवसेनेकडून समर्थन title=

मुंबई : मदर तेरेसांबाबतच्या मोहन भागवत यांच्या भूमिकेचं शिवसेनेकडून समर्थन, भागवतांचं काय चुकलं, सामनाच्या अग्रेलखातून उघड पाठिंबा.शिवसेनेनं सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भूमिकेचं समर्थन केलंय. मदर तेरेसांबाबत मोहन भागवत यांनी केलेल्या विधानानंतर शिवसेनेनं सामनामधून त्यांना पाठिंबा दिलाय.

भागवतांचे काय चुकले असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केलाय.सरसंघचालकांची पाठराखण करताना मुस्लिम धर्मांतरण आणि मिशनरी धर्मांतर याबाबतही अग्रलेखातून टीका करण्यात आलीय. यावेळी मदर तेरेसा यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्याबद्दल आदर असल्याचा उल्लेखही अग्रलेखात करण्यात आलाय.

मदर तेरेसा यांच्याविरूद्ध सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे देशभरात खळबळ माजलीय. यानिमित्तानं भागवतांवर टीकेची चौफेर झोड उठत असताना, संघ परिवारानं मात्र त्यांची जोरदार पाठराखण केलीय. मोहन भागवतांच्या याच वक्तव्यावरून वादाला तोंड फुटलंय.

मदर तेरेसा म्हणजे सेवाभावाचे मूर्तिमंत उदाहरण. निळी किनार असलेली पांढरीशुभ्र साडी नेसलेल्या मदर तेरेसा म्हणजे वंचित, शोषित, आजारी, अनाथ लोकांसाठी आशेचा किरणच जणू... ज्यांनी मातेच्या ममतेनं आणि बहिणीच्या मायेनं गोरगरीबांची, रूग्णांची सेवा केली, त्या सेवाधर्मामागं ख्रिश्चन धर्मांतराचा हेतू होता, असा स्पष्ट आरोप सरसंघचालकांनी केला. त्यावरून आता जोरदार राजकारण सुरू झालंय.

संसदेतही या वादाचे पडसाद उमटले. तेव्हा भाजपनं मदर तेरेसांच्या आत्मचरित्राचा हवाला देत, भागवतांच्या वक्तव्याची पाठराखण केली. या वादाला आरएसएस विरूद्ध ख्रिश्चन मिशनरीज असंही वळण लागलंय. गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ख्रिश्चन धर्मियांच्या मेळाव्यात बोलताना, भारतात प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य असेल, अशी ग्वाही दिली होती. मोदींच्या या अजेंड्याला गालबोट लावण्याचा संघ परिवाराचा डाव असावा, अशी शंका उपस्थित केली जातेय.

मदर तेरेसांबाबत असं वक्तव्य करण्यामागं सरसंघचालकांची काय भूमिका असावी? ज्या मदर तेरेसांना त्यांच्या सेवाभावी कार्यासाठी नोबेल, भारतरत्न आणि मॅगसेसे अशा पुरस्कारांनी गौरवण्यात आलं, त्यांच्याबद्दल असा आक्षेप घेणं कितपत योग्य आहे? आणि अशा वादामुळं जगभरात मान्यता पावलेल्या मदर तेरेसांची महती कमी होणार आहे का? असे सवाल आता उपस्थित होतायत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.