रात्री ९. २५ वाजता
- युती संदर्भात आज उद्धव ठाकरे बोलणार नाही
- येत्या २७ तारखेच्या सभेत, उद्धव ठाकरे बोलणार
- सेना नेत्यांनी दिली माहिती
सायंकाळी ७.४७ वाजता
- उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी रामदास आठवले मातोश्रीवर
- रामदास आठवले काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष
सायंकाळी ७ वाजता
- तिन्ही घटक पक्ष भाजपसोबत राहील - महादेव जानकर
- २५ वर्षाची युती आज अखेर आम्ही संपवितो आहे - एकनाथ खडसे
सायंकाळी ६ वाजून ४३ मिनिट
- अखेर भाजप युती तुटली
- घटक पक्षांना आम्ही न्याय देऊ शकत नव्हतो - एकनाथ खडसे
- आमचे शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले, आम्हीही आमच्या बैठकीची माहिती उद्धव ठाकरेंना दिली - एकनाथ खडसे
- महाराष्ट्राला काँग्रेस-राष्ट्रवादी मुक्त करण्याचा आमचा प्रयत्न होता - देवेंद्र फडणवीस
- शिवसेना एका आकड्याच्या आजूबाजूला फिरत होती - देवेंद्र फडणवीस
- शेवटच्या प्रस्तावावर घटक पक्ष नाराज होते - देवेंद्र फडणवीस
- विश्वासावर घटक पक्ष मुंडेनी एकत्र आणले होते - देवेंद्र फडणवीस
- शिवसेनेच्या भूमिकेत लवचिकता नव्हती- देवेंद्र फडणवीस
- जागांबाबत सेनेने तडजोड केली नाही - देवेंद्र फडणवीस
- आम्ही आमच्या मार्गाने धैय गाठणार - देवेंद्र फडणवीस
- सेनेची चर्चा आकडे आणि सीएमपदाभोवतीच राहील - देवेंद्र फडणवीस
- सेनेबाबत मैत्रीची भावना राहील, निवडणुकीदरम्यान कोणतीही टीका करणार नाही- देवेंद्र फडणवीस
- काँग्रेस- राष्ट्रवादी हटविण्याचे धैय - देवेंद्र फडणवीस
दुपारी ५ वाजता
- युती कायम राहावी ही आमची इच्छा - राजीव प्रताप रुडी
- युती तोडण्याचे केंद्रीय स्तरावरून कोणतेही निर्देश नाही - राजीव प्रताप रुडी
दुपारी ४.०० वाजता -
- 'महायुती' तोडण्यावर सेना-भाजपचा ब्लेमगेम
दुपारी ४.०० वाजता -
- शिवसेनेचा नवा फॉर्म्युला : शिवसेना 148 - भाजप 127- मित्रपक्षा 7 जागा
- शिवसेने आणि भाजपच्या चिन्हावर घटक पक्ष प्रत्येकी तीन जागा लढणार
दुपारी ३.४८ वाजता -
- अजूनही शिवसेनेची तयारी आहे - रावते
- रुडी नावाच्या व्यक्तीने सर्व घोळ घातलाय.
- राजीव प्रताप रुडी यांनी युती तोडण्याचे काम केले आहे.
- भाजपने शिवसेनेचा सन्मान राखला नाही - शिवसेना नेते दिवाकर रावते
- आम्ही ३ जागा जास्त देत होतो. बोलणी सुरु होती. मात्र मीडियातून चुकीचे वृत्त दिले जात होते.
- भाजपकडून चुकीचे संदेश मीडियातून पसरविण्यात येत आहे - शिवसेना नेते दिवाकर रावते
दुपारी ३.४४ वाजता -
- शिवसेना-भाजप युतीबाबत पुन्हा चर्चा करणार - देवेंद्र फडणवीस
- पत्रकार परिषदेत फडणवीस यांची माहीती
दुपारी ३.३५ वाजता -
- थोड्याच वेळात शिवसेना- भाजप नेते येणार मीडियासमोर
दुपारी ३.३५ वाजता -
- झी २४ तासच्या वृत्तावर शिक्कामोर्तब
- २५ वर्षांचा शिवसेना-भाजप युतीचा संसार तुटला
दुपारी ३.३० वाजता -
- अखेर २५ वर्षांची युती अखेर संपुष्टात आली आहे. याबाबत पीटीआय आणि एएनआयने वृत्त दिले आहे.
- भाजप नेते राजीव प्रताप रुडी यांच्याकडून ही माहिती मिळाल्याची चर्चा
दुपारी ३.३१ वाजता -
शिवसेना-भाजप युती तुटली - पीटीआय
दुपारी ३.०० वाजता -
उद्धव ठाकरेंनी घेतलं तुळजाभवानीचं दर्शन... सर्व सुरळीत होऊ दे, देवीला घातलं साकडं... महायुतीत बाबत अजूनही चर्चा सुरू, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया...
दुपारी ०२.१९ वाजता -
अखेर महायुती फुटल्यात जमा, घटकपक्षांनी दिले उमेदवारांना एबी फॉर्म, मित्रपक्षांच्या अनुपस्थितीत एबी फॉर्म भरले.
दुपारी १२.५६ वाजता -
काल रात्री दिलेल्या फॉर्म्युल्यावर ओम माथूर यांच्या उद्धव ठाकरेंसोबत फोनवरून चर्चा
दुपारी १२.४६ वाजता -
भाजप निवडणूक प्रभारी ओम माथूर यांच्या घरी शिवसेनेचे दिवाकर रावते आणि अनिल देसाई पोहोचले... अखेरची बोलणी करणार... भाजपचे सर्व प्रमुख नेते उपस्थित... भाजप दुपारी घेणार पत्रकार परिषद?
दुपारी १२ वाजता -
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तुळजापूरला रवाना
सकाळी ११.२० वाजता -
महायुती तुटल्यास आम्ही भाजपसोबत जावू, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंचं वक्तव्य... महायुती तुटली तर घटक पक्ष भाजपसोबत, विनोद तावडेंची माहिती
सकाळी ११.०५ वाजता -
युती तुटल्यात जमा, चार जागांवरून वाद... कोणत्या पक्षासोबत जायचं ते ठरवू - सदाभाऊ खोत...
सकाळी १०.२० वाजता -
भाजप नेते देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे हे शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटेंच्या भेटीला, मुंबईत बैठकांचे सत्र सुरु. मॅजेस्टिक आमदार निवास इथं बैठक सुरू.
सकाळी ९.२० वाजता -
महायुतीतील वादाच्या पार्श्वभूमिवर अमित शहा यांचा मुंबई दौरा रद्द... महायुतीतील जागवाटपाचा तिढा कायम,
मुंबई: उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे तीन दिवस बाकी असताना महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा कायमच आहे. महायुतीमध्ये जागावाटपाच्या चर्चेचं गुऱ्हाळ सुरुच आहे. महायुतीच्या जागावाटपासंदर्भात शिवसेना-भाजपची रात्री उशिरा आणखी एक बैठक झाली.
भाजप प्रभारी ओम माथुर यांच्या दक्षिण मुंबईतील निवासस्थानी झालेल्या या बैठकीत सेना भाजपचे नेते उपस्थित होते. जागावाटपाबाबत चर्चा जवळजवळ पूर्ण झाली असून चार-पाच जागांच्या अदलाबदलीबाबत शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असं शिवसेना नेत्यांनी सांगितलं. मात्र मित्रपक्षांच्या जागांबाबत अधिक स्पष्टता हवी अशी भूमिका भाजपनं घेतली.
लोकसभा निवडणुकीत ज्या घटकपक्षांनी साथ दिली त्या घटकपक्षांकडं दुर्लक्ष नको असं भाजपनं म्हटलंय. तर घटकपक्षाच्या वाट्याच्या चार जागा शिवसेना-भाजपला दिल्यात. त्यामुळं जागावाटपाचा तिढा मिटल्याचं सांगत महायुती निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी सज्ज असल्याचं राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी म्हटलंय.
या बैठकीला भाजपचे प्रभारी ओम प्रकाश माथूर, राजीवप्रताप रूढी, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी नेते विनोद तावडे, आशीष शेलार तसंच शिवसेनेकडून दिवाकर रावते, खासदार अनिल देसाई आणि उद्धव ठाकरेंचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. जागा आदलाबदलीबाबत महायुतीची आज आणखी एक बैठक होणार असून आज संध्याकाळपर्यंत महायुतीकडून जागाबाटपाबबत नेमका तोडगा जाहीर होण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.