मुंबई : मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी शिवसेनेची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ८४ शिवसेना आणि ४ अपक्षांनी पाठिंबा दिल्यानंतर ८८ संख्या असलेल्या शिवसेनेच्या गोटात पाचवा अपक्ष आला आहे.
बांद्रा येथील १०२ च्या अपक्ष नगरसेविका मुमताज खान शिवसेनेच्या गोटात दाखल झाल्या आहेत. पाचही अपक्ष नगरसेवकांना पाठीशी करण्यात सेनेला यश आले आहे.
पाचव्या अपक्ष नगरसेवकानंतर शिवसेनेचे संख्याबळ ८९ वर पोहचले आहे.
अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळीही सेनेच्या गोटात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सेनेची संख्या ९० पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
कोकण भवन इथं सेनेचा गट स्थापनेवेळी मुमताज खान हजर आहेत.