मुख्यमंत्र्यांची विनंती शिवसेना नेत्यांनी फेटाळली

मुख्यमंत्र्यांची विनंती शिवसेना नेत्यांनी फेटाळली असल्याचं सांगण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून शिवसेना नेत्यांना चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनात बोलवून घेतलं होतं. 

Updated: Nov 12, 2014, 11:01 AM IST
मुख्यमंत्र्यांची विनंती शिवसेना नेत्यांनी फेटाळली title=

मुंबई : मुख्यमंत्र्यांची विनंती शिवसेना नेत्यांनी फेटाळली असल्याचं सांगण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून शिवसेना नेत्यांना चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनात बोलवून घेतलं होतं. 

मात्र तुम्ही विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान करा, त्यानंतर मंत्रिपदाच्या वाटपावर चर्चा करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मात्र ही विनंती शिवसेना नेत्यांनी फेटाळून लावली आहे. 

एकंदरीत भाजप अजूनही 'आधी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान करा, मग मंत्रिपदावर चर्चा करू', या आपल्या भूमिकेवर कायम आहे. मात्र शिवसेना नेत्यांनी ही विनंती यापूर्वीही फेटाळली होती. म्हणून शिवसेना आणि भाजपमधील शेवटची चर्चा देखिल निष्फळ ठरली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.