शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी - नारायण राणे

बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही, आता ती उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झालीय, अशी घणाघाती टीका माजी मंत्री नारायण राणे यांनी आज झी २४ तासच्या खास मुलाखतीत बोलताना केली.

Updated: Mar 27, 2015, 06:49 PM IST
शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी - नारायण राणे  title=

मुंबई : बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही, आता ती उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झालीय, अशी घणाघाती टीका माजी मंत्री नारायण राणे यांनी आज झी २४ तासच्या खास मुलाखतीत बोलताना केली.

सरकारवर अंकुश ठेवायला मी विधानसभेत जातोय, असा विश्वास राणेंनी व्यक्त केलाय. माझ्यामागे माझा संपूर्ण पक्ष ताकदीनिशी उभा आहे. विधानसभेत विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसचं अस्तित्व दिसेनासं झालंय, धार कमी झालीय. कोकणातला पराभव मान्य. ओव्हर कॉ़न्फिडन्स नडला, ही वस्तुस्थिती, असल्याचेही राणे यांनी सांगितले. 

 एमआयएमचा उमेदवार शिवसेनेकडूनच ठरला, असा आरोप करताना 2 हजार पेक्षा जास्त मतंही एमआयएमला मिळणार नाहीत, असा दावा त्यांनी केलाय. नाईट लाईफची संकल्पना मांडून शिवसेना बाळासाहेबांच्या विचारापासून किती दूर चालली, याचं उदाहरण..... ती संकल्पना शिवसैनिकांना आवडली नाही, पण ते व्यक्त करण्याची धमक शिवसैनिकांकडे नाही, तिथे राणेच हवेत.... असेही त्यांनी सडेतोडपणे सांगितले. 

 शिवसेनेत उमेदवारीसाठी पैसे मागितले जाऊ नयेत, हा मुद्दा मांडला म्हणून मी शिवसेनेतून बाहेर पडलो.... नारायण राणे विधानसभेत नाहीत, तर शिवसेनेच्या मंत्र्यांची 

 झी 24 तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी दिलेल्या विशेष मुलाखतीत नारायण राणे यांनी रोखठोक  आणि परखड मतं व्यक्त केलीयत.....  

 कोकणात राणेंचा पराभव का झाला, राणेंनी शिवसेना का सोडली, नाईट लाईफबद्दल नारायण राणे काय म्हणाले, याबद्दलची त्यांची सविस्तर मुलाखत आपण पाहू शकणार आहात, आज रात्री 9 वाजता रोखठोकमध्ये.....  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.