www.24taas.com, मुंबई
अजित पवारांनी 24 तासांत 3 वेळा माफी मागूनही विरोधकांचा आक्रमक पवित्रा कायम आहे. अजित पवारांविरोधात विरोधक एकवटले असून, शिवसेना-भाजप आणि मनसे जिल्ह्या- जिल्ह्यात आंदोलन करणार आहेत.
विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातल्यामुळं विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. अजितदादांच्या बेताल वक्तव्यावरून मुख्यमंमत्र्यांनीही माफी मागावी अशी नवी मागणी विरोधकांनी केलीय. शिवसेनेनं विधानसभेत निंदाव्यंजक प्रस्ताव मांडला होता. मात्र अजित पवारांनी माफी मागितल्यामुळं हा प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळला. त्यामुळं विरोधकांचा गोंधळ सुरू होता.
त्यामुळं सलग दुस-या दिवशी संपूर्ण दिवसभरासाठी कामकाज तहकूब करावं लागलं. तर दुसरीकडे विधान परिषदेतही काहीकाळासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं होतं.