www.24taas.com, मुंबई
म्हाडाच्या कार्यालयात शिवसैनिकांनी गोंधळ घातला. 100 ते सव्वाशे शिवसैनिक म्हाडाच्या कार्यालयात घुसले होते. म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासाची मागणी करत, झालेल्या या आंदोलनात शिवसेनेचे आमदार आणि नगरसेवकही सहभागी झाले होते.
13 ते 18 सप्टेंबर दरम्यान एक बैठक घेऊन चर्चा करण्याचं आश्वासन म्हाडाचा मुख्य अधिकारी एम.के. सुधाकर यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.
दरम्यान, धोकादायक इमारतींमधून सुरक्षिततेसाठी किंवा ढासळलेल्या इमारतींतून संक्रमण शिबिरात स्थलांतरित केलेल्या रहिवाशांपैकी हजारो रहिवासी २५-३० वर्षं संक्रमण शिबिरात राहत आहेत. या लोकांना त्यांचं हक्काचं घर देण्यासाठी गेली काही वर्षं मास्टर लिस्ट तयार केली जात आहे.