प्रतिज्ञा दिन : 'पुढचा पंतप्रधान भाजप-शिवसेनेचाच'

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी शिवसेनेचा `प्रतिज्ञा दिन` सोहळा मुंबईत पार पडतोय. यावेळी, खुद्द उद्धव ठाकरेंनी अनेक शिवसैनिकांनी आपल्या हाताने `शिवबंधन धागा` बांधला. तसंच यावेळी महिला सुरक्षेसाठी मोबाईल अॅप्लिकेशनही लॉन्च करण्यात आलं.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 23, 2014, 05:23 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी शिवसेनेचा `प्रतिज्ञा दिन` सोहळा मुंबईत पार पडतोय. यावेळी, खुद्द उद्धव ठाकरेंनी अनेक शिवसैनिकांनी आपल्या हाताने `शिवबंधन धागा` बांधला. तसंच यावेळी महिला सुरक्षेसाठी मोबाईल अॅप्लिकेशनही लॉन्च करण्यात आलं.
काय काय म्हणाले उद्धव ठाकरे आपल्या भाषणात...
* ही प्रतिज्ञा आयुष्यभरासाठी आहे
* बाळासाहेबांच्या ऑडिओ क्लिपनं दिली सैनिकांना शपथ
* बाळासाहेबांच्या ऑडिओ क्लिपनं दिली सैनिकांना शपथ
* राष्ट्रवादी केवळ हूल देऊन जागा वाढवून घेते - उद्धव
* राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही - उद्धव
* युती तोडली तर काँग्रेसवाले यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावतील
* राष्ट्रवादी युती तोडणं शक्य नाही
* राष्ट्रवादीवर उद्धव ठाकरेंची टीका
* हिंदुस्थानात हिंदू आहे हे सांगणं गुन्हा आहे का?
* आत्ताची काँग्रेस ही भ्रष्टाचारानं बरबटलेली
* ही स्वातंत्र्यापूर्वीची काँग्रेस नाही
* इतर धर्मगुरुंना हात लावण्याची हिंमत आहे का? - उद्धव
* शंकराचार्यांना तुरुंगात डांबलेलं आठवतंय का? - उद्धव
* मतांसाठी जातीचं राजकारण - उद्धव
* पुढचा पंतप्रधान भाजप-शिवसेनेचाच : उद्धव
* हिंदू असल्याचा मला गर्व आहे - उद्धव
* आम्ही नव्हे, काँग्रेसवाले धर्मांध आहेत - उद्धव
* होऊनच जाऊ द्या - उद्धव ठाकरे
* ऑपरेशन यशस्वी पण पेशंट खल्लास - उद्धव
* मंत्र्यांना सोडलं आणि अधिकाऱ्यांना लटकावलं - उद्धव
* पृथ्वीराजांची घोटाळे झाकताना त्रेधातिरपीट - उद्धव
* मुख्यमंत्र्यांवरही केली टीका
* या २५ जानेवारीला काँग्रेस पंतप्रधानाचं शेवटचं भाषण - उद्धव
* पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर केली टीका
* इतका दुबळा पंतप्रधान कधी पाहिला नव्हता - उद्धव
* गर्दी पाहून अनेकांच्या पोटात गोळे येतील - उद्धव
* ही शक्ती बाळासाहेबांचीच - उद्धव
* शिवसैनिकांना लाचार होऊ देणार नाही - उद्धव
* जे काही करीन ते शिवसैनिकांच्या हिताचंच - उद्धव

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.