शिवसेनेच्या वचननाम्यातील बजेटमध्ये काय आणि नाही?

शिवसेनेने मुंबईकरांना निवडणुकीआधी जी आश्वासने दिली होतीत. त्यातील काहींचा विसर पडलेला दिसत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 29, 2017, 06:58 PM IST
शिवसेनेच्या वचननाम्यातील बजेटमध्ये काय आणि नाही? title=

मुंबई : शिवसेनेने मुंबईकरांना निवडणुकीआधी जी आश्वासने दिली होतीत. त्यातील काहींची पूर्तता होण्यासाठी आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली आहे. तर काही कामांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. ही कामे मार्गी लागण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही.

बजेटमध्ये काय ?

- स्वातंत्र्य संग्रामाचे संग्रहालयायाठी तरतूद
- नवीन उद्याने
- सँनिटरी नँपकिन व्हेंडिग मशीन
- डंपिंग ग्राऊंड कचरा प्रक्रिया केंद्र
- मलनि:सारण वाहिन्यांची व्याप्ती वाढवणार 
- सार्वजनिक शौचालयांसाठी भरीव तरतूद नाही
- मलजल प्रक्रिया केंद्र
- गारगाई पिंजाळ प्रकल्पा, कोस्टल रोड, गोरेगाव-मुलूंड लिंक रोड, माहूल पंपिंग स्टेशनसाठी तरतूद
- शालेय विद्यांर्थ्यांना मोफत बस प्रवास
- जलतरण तलाव

 हे बजेटमध्ये नाही

- पालिकेच्या बजेटमध्ये ५०० चौरस फूटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यासंदर्भातील तरतूद नाही
- तसंच ५०० ते ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांनाही मालमत्ता करात सवलत देण्याची घोषणाही हवेतच
- विनामूल्य आरोग्यसेवा देणारी बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना
- मधुमेहांवर उपचार करणारी विशेष रूग्णालये
- आरोग्यसेवा आपल्या दारी 
- बहुरूग्णवाहिका
- जेनेरीक मेडिसिन दुकाने
- रात्री कचरा उचलण्याची सोय
- जुन्या विहिरींचे पुनर्जिवित करणे
- बेस्ट कर्मचा-यांना विमाकवच
- पशू आरोग्य सेवा
- पालिका कर्मचा-यांसाठी घरकूल योजना
- सफाई कर्मचा-यांसाठी अत्याधुनिक साहित्य
- फूटबॉल मैदाने व आंतरराष्टृीय नेमबाज केंद्र
- गोवंडी येथे आंतरराष्टृीय दर्जाचे केंद्र
- गावठाण, कोळीवाडे येथील सीआरझेडमधील मूळ बांधकामे अधिकृत करणार