मुंबई : शिर्डीमधल्या साईबाबा संस्थानाचं अध्यक्षपद, भाजपकडे जाणार आहे. त्याचवेळी मुंबईतलं सिध्दीविनायक मंदिराचं अध्यक्षपद शिवसेनेला मिळणार आहे. तर कोल्हापुरातल्या महालक्ष्मी मंदिराच्या अध्यक्षपदाबाबत निर्णय व्हायचा आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. शिर्डी साईबाबा संस्थान राज्य सरकारनं ताब्यात घेऊन, त्यावर राजकीय व्यक्तीची नेमणूक केली होती. त्याविरोधात औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्यानंतर, ते विश्वस्त मंडळ न्यायालयानं तीन वर्षांपूर्वी बरखास्त केलं. त्यानंतर आता पावसाळी अधिवेशनादरम्यान साईबाबा संस्थानचं नवं विश्वस्त मंडळ जाहीर केलं जाणार असल्याचं राम शिंदे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, विश्वस्त मंडळात महायुतीचे घटक पक्षांचाही सहभाग असणार आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली साईबाबा संस्थान विश्वस्तपदाची नेमणूक या अधिवेशन काळात घेतली जाईल, असे राम शिंदे म्हणालेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.