भर पावसात वयोवृद्ध आईला गाडीतून फेकून देऊन 'तो' पळून गेला...

आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत घडल्याचं समोर येतंय...

Updated: Aug 4, 2015, 11:45 AM IST
भर पावसात वयोवृद्ध आईला गाडीतून फेकून देऊन 'तो' पळून गेला...  title=
हंसा राजपूत यांच्यावर जीटी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू

मुंबई : आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत घडल्याचं समोर येतंय...

८५ वर्षाच्या हंसा राजपूत नावाच्या महिलेला गर्भश्रीमंत असलेल्या तिच्या मुलाने एका आलिशान कारमधून येत बॉम्बे हॉस्पिटलच्या बाहेर बेवारसपणे फुटपाथवर फेकून दिलं... आणि आला त्याच वेगानं गाडी घेऊन निघून गेला. 

ती वृद्ध महिला पावसात थंडीने थरथरत पडून होती. तेव्हा त्या भागातून जाणाऱ्या आणि पेशाने डॉक्टर असलेल्या निरंजन पटेल यांनी पोलिसांच्या सहाय्याने त्या असहाय्य वृद्ध महिलेला गोकूळदास तेजपाल रुग्णालयात (जीटी हॉस्पीटल) दाखल केलंय. 


हंसा राजपूत यांच्यावर जीटी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू 

गोकूळदास तेजपाल हॉस्पीटलमध्ये आता त्या वृद्ध महिलेवर उपचार सुरु आहेत. वयोमानामुळे काहीसा स्मृतीभ्रंश झालेल्या त्या वृद्ध महिलेला मुलाच्या नावाच्या पलीकडे स्वत:च्या घराचा पत्तादेखील सांगता येत नाहीये.

एकीकडे ओळख नसतांनाही माणुसकीच्या भावनेतून या वृद्ध महिलेला मदत करणारे डॉ. निरंजन पटेल आणि दुसरीकडे भरपावसात आईला रस्त्यावर फेकून जाणारा रक्ताच्या नात्याचा मुलगा... स्वत:च्या कृत्यातून लोक स्वत:ची खरी ओळख करून देतात, हेच खरं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.