मुंबई : आज मध्यरात्री मध्य रेल्वेवर विशेष जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसटीहून शेवटीची लोकल ११.३० वाजण्याची असणार आहे. तर लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल असून काही गाड्या रद्द केल्या गेल्यात.
हार्बर वगळता त्यानंतरच्या सर्व गाडय़ा कुर्लाहून सुटणार आहेत. ‘मरे’चा विशेष ब्लॉक मध्य रेल्वेवर बुधवारी झालेल्या तांत्रिक बिघाड गोंधळाने रुळावरून घसरलेले वेळापत्रक अद्याप रखडलेले असतानाच शनिवारी मध्यरात्री मध्य रेल्वेवर विशेष जम्बो ब्लॉक होणार असल्याने रेल्वे गोंधळ कायमच राहाणार आहे.
कुर्ला येथील कसाईवाडा भागातून रेल्वेमार्गावरून पूर्व-पश्चिम जाणारा पादचारी पूल बांधण्यासाठी शनिवारी मध्यरात्री १२.१५ पासून रविवारी सकाळी ६.१५ पर्यंत हा ब्लॉक आहे. त्यामुळे सीएसटीहूनकर्जतकडे जाणारी शेवटची गाडी रात्री साडेअकरा वाजता तर हार्बरची शेवटची गाडी ११.३८ वाजता सुटेल.
पहिली गाडी रविवारी पहाटे ५ नंतर रवाना होईल. त्यानंतरच्या काही गाड्या कुर्ला स्थानकातून तर सीएसटी-खोपोली ही गाडी ठाणे स्थानकातून सुटणार आहे. सीएसटीहून पहिली गाडी रविवारी पहाटे ५.५२ वाजता सुटेल. ब्लॉकच्या काळात मुख्य मार्गावरील तब्बल २४ आणि हार्बर मार्गावरील २८ सेवा रद्द असतील.
तसेच अनेक लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या वेळाही बदलल्या जाणार आहेत. तसेच रविवारी मुंबई-पुणे-मुंबई सिंहगड एस्क्प्रेस आणि मनमाड-मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्यात.
- पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस
- मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस
- मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस
- मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस लांब
- एर्नाकुलम-मुंबई वातानुकुलित विशेष गाडी ठाण्यापर्यंतच.
- भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस दादपर्यंतच.
- मंगळूर-मुंबई एक्स्प्रेस दादपर्यंतच.
- साईनगर शिर्डी-मुंबई जलद पॅसेंजर दादपर्यंतच.
- अमरावती-मुंबई एक्स्प्रेस दादपर्यंतच.
- गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस दादपर्यंतच.