www.24taas.com, मुंबई
डिझेल दरवाढीनं आर्थिक संकटात सापडलेल्या एसटीवर तिकिटाच्या दरांत वाढ करण्याशिवाय पर्याय राहिलेला नव्हता मात्र, या संकटावर मात करण्यासाठी एसटीनं आता एक शक्कल शोधून काढलीय.
एसटीनं आता इंधन थेट पंपावर विकत घेण्याचा निर्णय घेतलाय. तेल कंपन्यांकडून घाऊक प्रमाणात मिळणारं इंधन ६४ रुपये प्रति लिटर या दरानं एसटीला विकत घ्यावं लागतं. तेच इंधन एसटी आता थेट पंपावर ५३ रुपये लिटर दरानं विकत घेणार आहे. कर्नाटक परिवहन महामंडळ ही शक्कल गेल्या तीन दिवसांपासून अंमलात आणतंय. या नामी उपायानं एसटीला काहीसा दिलासा मिळेल अशी आशा आहे. त्यातून महामंडळाचे दिवसाचे १ कोटी १९ लाख रुपये थेट वाचणार आहेत.
यानिमित्तानं महामंडळानं इंधनावरील २२.५ टक्के व्हॅट कमी करण्याची तसंच प्रवासी कर कमी करण्याची मागणी राज्य सरकारला केलीय. तसंच महामंडळाचे थकीत १६९० कोटी रुपये राज्य सरकारनं दिल्यास एसटीच्या सर्व समस्या सुटण्यास मदत होऊ शकेल.