www.24taas.com झी मीडिया, मुंबई
एसटीने आपला स्मार्ट लूक दाखवण्यास सुरूवात केली आहे. एसटीने आपल्या ताफ्यात होल्वो, शिवनेरी गाड्याची भर टाकली आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन युक्त्या सुरू केल्या आहेत. मुंबई ते गोवा एसटी गाडी सुरू केली आहे आणि आता त्याही पुढे पाऊल टाकत एसटीने आता फेसबुकची कास धरत प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नवा फंडा वापरला आहे. एसटी फेसबूकच्या माध्यमातून तुमच्या भेटीला.
ऑनलाईन फेसबूक पाठोपाठ आता प्रवाशांच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न एसटीने केला आहे. प्रवाशांच्या समस्या, सुचना जाणून घेण्यासाठी फेसबूक या सोशल नेटवर्किग साईटवर www.facebook.com/msrtc.in ही साईट तयार केली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना एसटीची अधिक माहिती मिळणार आहे.
सर्वत्र नेटवर्किगसाईटद्वारे काम केले जात असल्याने आणि मोबाईलवरही त्याचा वापर वाढल्याने लवकरात लवकर प्रवाशांपर्यत पोहोचण्यासाठी फेसबुकवर हे अकाऊंट सुरू केले आहे. यावर प्रवाशांनी आपल्या समस्या सांगाव्यात. या समस्याचे तात्काळ निराकरण करण्यात येईल, असे एसटी महामंडळाने सांगितले आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.