मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या मंत्रिमंडळ विस्तारसंदर्भात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मुंबईतल्या निवास्थानी घटक पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक झाली. दरम्यान, मित्र पक्षांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची मागणी केलेय.
या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही हजर होते. घटक पक्षांच्यावतीनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, सदाभाऊ खोत उपस्थित होते. रिपाइंचे नेते आणि खासदार रामदास आठवलेंनीही बैठकीला उपस्थिती लावली. रिपाइंला केंद्रात आणि राज्यात मंत्रीपद मिळावं, अशी मागणी त्यांनी या बैठकीत केलीय. तसंच राज्यात कॅबिनेट मंत्रिपदाची अपेक्षा आठवलेंनी व्यक्त केलीय.
तसंच घरात सत्ता ठेवण्याचा विचारांचे आपण नाहीत त्यामुळं कुटुंबात मंत्रिपद ठेवण्याचा प्रश्नच येत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. यावेळी इतर पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक पूर्व आश्वासनं पाळावीत, अशी मागणी केली. तसेच राजू शेट्टी यांनीही निवडणुकीपूर्वी जी काही आश्वासने दिली आहेत, त्याची पूर्तता करण्यात यावी, असे म्हटले आहे. त्यामुळे कोणाला किती मंत्रीपदे वाट्याला येतात याकडे लक्ष लागलेय.
दरम्यान, शिवसेनेने मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उशिर होत असल्याने भाजपलाच जबाबदार धरले आहे. तर सेनेने दोन कॅबिनेटची मागणी केल्याचे वृत्त आहे. अधिकृत याबाबत दुजोरा मिळालेला नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.