मुंबईत स्वाईन फ्लूनं आणखीन एक बळी

मुंबईत स्वाईन फ्लूनं आणखीन एक बळी घेतला असून स्वाईन फ्लूचा मुंबईतला हा सातवा बळी ठरलाय. स्वाईन फ्लूनं मृत्यू झालेल्या सात रुग्णांपैकी पाच जणांना मधुमेह असल्याचं निष्पन्न झालंलय त्यामुळे मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांना स्वाईन फ्लूचा अधिक धोका असावा असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केलाय. 

Updated: Feb 11, 2015, 08:27 PM IST

मुंबई : मुंबईत स्वाईन फ्लूनं आणखीन एक बळी घेतला असून स्वाईन फ्लूचा मुंबईतला हा सातवा बळी ठरलाय. स्वाईन फ्लूनं मृत्यू झालेल्या सात रुग्णांपैकी पाच जणांना मधुमेह असल्याचं निष्पन्न झालंलय त्यामुळे मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांना स्वाईन फ्लूचा अधिक धोका असावा असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केलाय. 

दरम्यान राज्यात स्वाईन फ्लूचा विळखा दिवसेंदिवस वाढतच चालला असून राज्यातील स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या 41वर गेली आहे. ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरामधल्या गीता देठे या ६० वर्षांच्या महिलेचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालाय. तर त्यांच्या २० वर्षांच्या नातीलाही स्वाईन फ्लूची लागण झाली असून, तिच्यावर मुंबईतल्या फोर्टीज रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 या पार्श्वभूमीवर खबरदारीचे उपाय योजत असल्याचं, कुळगाव बदलापूर नगर परिषद प्रशासनानं सांगितलंय. तर प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी नगर परिषद कार्यालया समोर आंदोलन केलं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.