मुंबई : ऑटो रिक्शा आणि टॅक्सीच्या प्रस्तावित भाडेवाडीस मुंबई हायकोर्टानं सशर्त परवानगी दिलीय.
यासाठी, राज्य सरकारला सर्वच्या सर्व रिक्षा आणि टॅक्सीचे मीटर्स हे ‘कैलिब्रटेड’ झाले आहेत, हे कोर्टाला आश्वस्त करून द्यावं लागणार आहे.
ऑटो आणि टॅक्सीच्या प्रस्तावित किमान 2 रूपये भाडोवाढीच्या विरोधात ग्राहक मंचातर्फे हायकोर्टात याचिका करण्यात आलीय. त्या संदर्भातील सुनावणी दरम्यान न्यायालयानं राज्य सरकारला आज हमीपत्र देण्यास सांगितलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.