मुंबईत रिक्षा - टॅक्सी चालकांनी संप केला तर होणार कारवाई

रिक्षा - टॅक्सी संपाविरोधात कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले आहेत. ओला आणि ऊबर टॅक्सीला परवानगी देण्यात आल्याच्या निषेधार्थ ऑटोरिक्षा आणि टॅक्सीचालकांनी बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.

Updated: Aug 25, 2016, 04:39 PM IST
मुंबईत रिक्षा - टॅक्सी चालकांनी संप केला तर होणार कारवाई title=

मुंबई : रिक्षा - टॅक्सी संपाविरोधात कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले आहेत. ओला आणि ऊबर टॅक्सीला परवानगी देण्यात आल्याच्या निषेधार्थ ऑटोरिक्षा आणि टॅक्सीचालकांनी बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.

या संपाविरोधात प्रवीणकुमार उपाध्याय यांनी जनहित याचिका दाखल केली होती. ऑटो - टॅक्सी चालकांनी आपल्या मागण्या कायदेशीर मार्गानं मांडाव्यात. त्यासाठी जनतेला वेठीस धरणे चुकीचे आहे. अशाप्रकारं संप केल्यास कारवाई करण्यात यावी, असे निर्देश मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठानं दिले आहेत.

या संपामुळे लोकांना त्रास होवू नये यासाठी पर्यायी उपायोजना देखील तयार ठेवा, असेही निर्देश सरकारला देण्यात आले आहेत. 29 ऑगस्टचा संप पुरकारण्याची घोषणा टॅक्सी - रिक्षा चालक संघाने दिली होती.