प्रथम वर्ष पदवी प्रवेश, मुंबईत कट ऑफचा टक्का नव्वदी पार

मुंबई विद्यापीठ आणि संलग्न कॉलेजमधल्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पहिली मेरिट लिस्ट जाहीर झाली. कट ऑफचा टक्का ९० पार गेलाय. 

Updated: Jun 17, 2015, 11:48 AM IST
 प्रथम वर्ष पदवी प्रवेश, मुंबईत कट ऑफचा टक्का नव्वदी पार  title=

मुंबई : मुंबई विद्यापीठ आणि संलग्न कॉलेजमधल्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पहिली मेरिट लिस्ट जाहीर झाली. कट ऑफचा टक्का ९० पार गेलाय. 

यंदा बारावी बोर्डाचा लागलेला विक्रमी निकाल आणि ९० टक्क्यांहून अधिक मार्क मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि जोडीला सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डांचाही वाढलेला निकाल यामुळे एफवायच्या पहिल्या मेरिट लिस्टचा कट ऑफ काय लागतो याकडे लक्ष लागलं होतं. 

 अनेक कॉलेजमधील मेरिट लिस्टवर नजर टाकली असता, सायन्स आणि बीएमएम, बीएमएस, बीएससी आयटी, बीएससी (कम्प्युटर सायन्स), बीकॉम (बँकिंग अ‍ॅण्ड इन्शुरन्स), बीकॉम (अकाऊंट अ‍ॅण्ड फायनान्स) अशा सर्व पारंपरिक व सेल्फ फायनान्सच्या आदी शाखांमध्ये प्रवेश घेण्याचा विद्यार्थ्यांचा कल यंदाही कायम असल्याचे दिसून आले. 

मुंबईतील कॉलेजांची कट ऑफ लिस्ट

रुईया कॉलेज । बीए : ९०.९२ । बीएस्सी : ७८.७७ । बीएससी बायोटेक्नोलॉजी : ९.६० । 
बीएससी बायोकेमिस्ट्री : ८२.१५ । बीएससी सीएस ७८.३१ । बीएससी बायोअनलेटीकल
सायन्स ७१.३८

बीएमएम इंग्रजी माध्यम : आर्ट‍्स ८८.०० । 
सायन्स ९०.९२ । कॉमर्स ९०.७७

बीएमएम मराठी माध्यम : आर्ट्‍स ५१.०० । 
सायन्स ४८.०० । कॉमर्स ५६.००

एनएम कॉलेज : बीकॉम ९५.८० । बीएमएस
कॉमर्स ९५.९२ । सायन्स ८७.०० । आर्ट्‍स ८४.१५ । बीएफएम ९४.८० । बीएससी आयटी गणितात ७०.००

एमडी कॉलेज : बीकॉम प्रवेश बंद (इन हाऊसनंतर) । बीबीआय ७०.०० । बीएफएम ६०.००

पोदार कॉलेज : बीकॉम ९४.२० । बीएमएस 
कॉमर्स ९४.४० । आर्ट्‍स ७३.२३ । सायन्स ८६.४०

केळकर कॉलेज : बीए ७६.०० । बीकॉम ८९.६० । 
बीएससी बायो टेक्नोलॉजी ८०.०० । बीबीआय ८२.६२ । बीएस्सी आयटी गणितात ७८.००

किर्ती कॉलेज : बीए ७७.८४ । बीकॉम ८४.६१ । 
बीएससी ६३.०७ । बीएससी बायोटेक्नोलॉजी ६५.०० । बीएससी सीएस ७२.०० । बीएससी आयटी गणितात ५९.००

बीएमएम : आर्ट्‍स ६३.०० । कॉमर्स ७२.०० ।
सायन्स ६९.०० । बीएमएस : कॉमर्स ८०.०० । आर्ट्‍स ६२.०० । सायन्स ६१.०० 

पेंढारकर कॉलेज : बीए ५०.०० । बीएमएस ६५.०० । बीकॉम ६२.०० । बीएससी ५०.००

साठ्ये कॉलेज : बीएससी ६८.८ । बीकॉम ८०.७ ।
बीए ३५.८ । बीएससी आयटी गणितात ६३.००

बीएमएस : कॉमर्स ७८.६ । सायन्स ५८.६ । आर्ट‍्स ५०.०० । इतर ७८.०० , बीएमएम ४४.९ 

एस.के. सोमय्या कॉलेज : बीए ६६.०० । 
बीकॉम ७८.५ । बीएमएस : आर्ट्‍स ६५.८ । 
सायन्स ७७.६ । कॉमर्स ८२.० । इतर ७८.१

बीएमएम : आर्ट्‍स ७२.९ । कॉमर्स ७९.०० ।
सायन्स ७०.०० । बीएएफ ८७.२ । बीबीआय ७८.७ । बीएफएम ७७.७ । बीएससी सीएस ६८.०० । 
बीएससी आयटी गणितात ८०.००

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.