पावसाळ्यापूर्वी राज्यातले सर्व जुने पूल दुरुस्त होणार

पुढल्या वर्षाच्या पावसाळ्यापूर्वी राज्यातले सर्व जुने पूल दुरुस्त केले जाणार आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

Updated: Aug 26, 2016, 09:19 AM IST
पावसाळ्यापूर्वी राज्यातले सर्व जुने पूल दुरुस्त होणार title=

मुंबई : पुढल्या वर्षाच्या पावसाळ्यापूर्वी राज्यातले सर्व जुने पूल दुरुस्त केले जाणार आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

सावित्री नदीवरचा पूल दुर्घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभाग कामाला लागलं आहे. राज्यातल्या जुन्या पुलांसंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी अधिकारी आणि तज्ज्ञ व्यक्ती आणि संस्थांची पुण्यात बैठक घेतली. येत्या दोन महिन्यांत राज्यातल्या सर्व जुन्या पुलांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे. त्यानंतर डिसेंबर महिन्यात दुरुस्तीच्या कामाच्या निविदा काढून, पुढल्या पावसाळ्यापूर्वी पुलांची दुरुस्ती केली जाणार आहे.