मुंबई : एनएसएने अँटी टेररिस्ट स्क्वॉड आणि महारष्ट्र पोलिसांना दहशतवादी हल्ल्याची शक्यता होऊ शकतो असा इशारा दिला आहे. एनएसएच्या या अलर्टनंतर वेस्टर्न कोस्ट लाइनवर सगळ्यात जास्त सतर्कता राखली जात आहे.
महाराष्ट्र सरकारला इशारा देण्यात आला आहे की, नवरात्र उत्सवादरम्यान गर्दीच्या ठिकाणी आणि मंदिरांना विशेष करुन लक्ष्य केलं जाऊ शकतं. असं म्हटलं जातंय की दहशतवादी १९ नोव्हेंबरपर्यंत हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. भारतीय लष्कराने पीओकेमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई हे भारतातलं अतिशय महत्त्वाचं आणि गर्दीचं ठिकाण असल्याने नेहमीच ते दहशतवाद्यांचं टार्गेटवर राहिलं आहे.