मुंबई : राज्यातले १४४ कत्तलखाने बंद करण्याचा निर्णयही पर्यावरण विभागानं घेतला आहे. तसेच पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या उत्पादनावर सरसकट बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारच्या पर्यावरण विभागानं घेतला आहे. आज सोमवारपासूनच हा निर्णय लागू होत असल्याचं पर्यावरणमंत्री रामदास कदम यानी स्पष्ट केले होते.
राज्यातले १४४ कत्तलखाने बंद करण्याचा निर्णयही पर्यावरण विभागानं घेतलाय. प्रदूषण नियंत्रण कायद्याचं उल्लंघन केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली. १४४ कत्तलखान्यांपैकी १२८ छोटे कत्तलखाने, तर १६ मोठे कत्तलखाने बंद होणार आहेत.
८ बाय १२ या आकाराची आणि ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर ही बंदी लागू असेल. तर याआधी अशा प्रतिच्या प्लास्टिकच्या वापरावर बंदी होती मात्र उत्पादनावर अटकाव नव्हता. तेव्हा या प्लास्टिक पिशव्यांच्या उत्पादनावरच बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयांच उल्लंघन करुन प्लॅस्टिक पिशव्या उत्पादन करणा-यांना पाच वर्षांची सक्तमजुरी तसंच पाच लाख रुपयांच्या दंडाची तरतू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे कागदी पिशव्या वापरास प्रोत्साहन मिळणार आहे. तसे मंत्र्यांनी स्पष्ट केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.